Header Ads

वडूजच्या नगराध्यक्षसह सहा जणांवर सावकारकीसह अपहरणाचा गुन्हा दाखल crime

सातारा : खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक संदीप निवृत्ती गोडसे यांनी नगराध्यक्ष सुनील हिंदुराव गोडसे यांच्यासह सहा जणांच्यावर सावकारकीसह अपहरणाची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात दिली असून संबंधितांवर दोन्ही कलमानव्ये गुन्हा दाखल झाल्याने वडूज परिसरात राजकीय दृष्ट्या खळबळ माजली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, नगरसेवक संदीप निवृत्ती गोडसे यांना जुन 2014 मध्ये लोकांचे देणे भागविण्यासाठी व औषधउपचारासाठी पैशाची गरज असल्याने नगराध्यक्ष सुनिल हिंदुराव गोडसे, सचिन तुकाराम माळी, जयवंत माधवराव पाटील यांना बोलून दाखविले होते. त्या वेळी सुनील गोडसे यांनी तुम्हाला रक्कम उसनबार देतो तुम्ही सवडीने परत करा. नाममात्र वार्षीक 15 टक्के प्रमाणे व्याज द्या असे ही त्यांनी सांगितले. त्यांनी दि. 22 मार्च 2019 रोजी सुनिल गोडसे यांच्याकडुन आई व वडीलांचे दवाखान्यासाठी 9 लाख रुपये पत्नी नम्रता गोडसे ह्यांच्या नावे चेक देवन रक्कम व्याजाने घेतली होती. सदर रक्कमेच्या व्याजापोटी नम्रता गोडसे यांच्या गळ्यातील सर्व सोन्याचे दागिने बँकेत गहान ठेवून व  पैसे जमवुन व्याजापोटी सुनिल गोडसे यांना दिले होते. तसेच जेसीबी खरेदीसाठी सुनिल हिंदुराव गोडसे यांच्याकडून 11 लाख रुपयांची मदत मागीतली. सदरची रक्कम वडूज शाखांचे कराड अर्बन बँकेच्या खात्यातुन संदीप गोडसे यांना ट्रान्सफर केले. सदर  रक्कमेपोटी वेळच्यावेळी व्याज दे असे बजावले.  त्यानंतर 20 जानेवारी ला 23 लाख रुपये सुनिल गोडसे यांना जगदीश विठ्ठल गोडसे याच्या समक्ष परत केली.

तदनंतर दि. 14 जून 2019 रोजी वडूज नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदीसाठीची निवडणुक लागली. त्या वेळी नगराध्यक्ष पदासाठी सुनिल गोडसे यांनी जर तु मला मदत केली नाही तर मला उसणवार घेतलेल्या रक्कमेचे सावकरी पध्दतीने जादा व्याजाची रक्कम द्यावी लागेल अशी धमकी दिली. तसेच माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे,  जयवंत पाटील, राजेंद्र चव्हाण, सचिन माळी सर्व (रा. वडुज) यांनी संदीप गोडसे उचलुन नेऊन  हरणेबंदर, कोल्हापुर,पुणे लोणावळा महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी नेऊन ठेवले होते. त्या दरम्यान संदीप किसन गोडसे व प्रदिप किसन गोडसे (दोन्ही रा.वडज) यांनी संदीप गोडसे यांच्या घरावरती लक्ष ठेवुन सतत घरातील लोकांना भितीचे छायेखाली ठेवले होते.नगराध्यक्ष पदी  सुनिल गोडसे  निवडुन आल्यानंतर उसनवार घेतलेल्या रक्कमेची जादा आकारणी करुन त्यासाठी धमकीचे फोन करत आहेत. तसेच जयवंत पाटील गावात आल्यावर अडवुन तुम्ही सुनिल गोडसे यांचे पैसे परत द्या असे म्हणून तसेच आमचे विरुध्द तक्रार दिलेस जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सर्व रक्कम त्यांना परत दिली असताना आता विनाकारण नाहक पैशाच्या वसुलीसाठी त्रास देत आहेत. तसेच कुटंबियांना गुंडाच्या मदतीने वारंवार जीवे मारण्याची व घर सोडुन जाण्याची धमकी देत आहेत.  संदीप किसन गोडसे, प्रदिप किसन गोडसे हे घरी येवुन सुनिल  गोडसे यांचे पैसे परत दे नाहीतर आता व्याजाचे पैसे दे असे म्हणुन मला व आमच्या घरातील लोकांना दगड़ व काठ्यांनी मारहान केली. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुनिल गोडसे, विपुल पोपटराव गोडसे.(3)जयवंत माधवराव पाटील, (4)राजेंद्र बाळकृष्ण चव्हाण (5)सचिन तुकाराम माळी (6)सदिप किसन गोडसे, (7)प्रदीप किसन गोडसे सर्व रा.वडूज यांनी आपसात संगणमत करुन घरी येवुन व्याजाची रक्कम  देत जा नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. अशा प्रकारची फिर्याद संदीप निवृत्ती गोडसे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली असून नगराध्यक्ष सह सहा जणांच्या विरोधात सावकारकी व संगनमताने अपहरण केल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून सदर घटनेचा अधिक तपास पो. नि. अशोक पाटील करीत आहेत.

No comments