Header Ads

घरफोडी चोरीच्या गुन्हयातील सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात crime

सातारा : बोरगाव पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीच्या विविध गुन्हयातील फरार संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. दि.१७ रोजी श्री.सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना घरफोडी चोरीच्या गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी हा विरेंद्र ॲकॅडमी शेजारी नागठाणे ता.जि.सातारा या परिसरात असले बाबतची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे  प्रसन्न जहाड व त्यांच्या पथकास संशयित आरोपी ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने विरेंद्र अॅकॅडमी शेजारी नागठाणे ता.जि.सातारा या परिसरात सापळा लावून घरफोडी चोरीच्या गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीस ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीकामी बोरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षकधीरज पाटील, यांच्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसन्न जराड, तानाजी माने, संतोष पवार, कांतीलाल नवघणे, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, निलेश काटकर, विशाल पवार, विक्रम पिसाळ, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.

No comments