Header Ads

पिलाणीवाडीत सव्वा लाखाची घरफोडी; बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल crime

सातारा : पिलाणीवाडी (वरची) ता. सातारा येथील चंद्रभागा बाळकृष्ण साळुंखे वय-४० यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास सव्वा लाखाचे दागिने चोरून नेले. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रभागा साळुंखे हा कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. पेटीतील पितळेच्या डब्यातील १ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. साळुंखे या काही वेळानंतर घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शना आले. यानंतर त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

No comments