Header Ads

चार मित्रांना सोबत घेऊन घेतला बदला; एकाला सातारा शहर तर दोघांना स्थानिक गुन्हेच्या पथकाने केली अटक crime

सातारा : हॉटेलमध्ये काम करत असताना मालकासोबत झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी हॉटेल कर्मचा-याने मित्रांच्या सोबतीने हॉटेलमध्ये जबरी चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी एकाला सातारा शहरच्या तर इतर दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हेच्या पथकाने अटक केली आहे. करण धनाजी वाघमोडे वय-२०, रा. निमसोड, ता. खटाव, संतोष अशोक उपाध्याय, मल्लाप्पा चंदाप्पा कांबळे हे तिघे अटकेत असून अमान नामक संशयित अद्याप फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गोडोली येथील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये ३ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक चौघाजणांनी प्रवेश केला. त्यांच्या हातात तलवार, सुरा, गज, लाकडी दांडके होते. हॉटेलमधील कर्मचारी महेश मोरे यांना दमदाटी करून जबरदस्तीने काऊंटरवरमधील ८० हजारांची रोकड घेऊन संबंधितांनी पलायन केले होते. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी तपासाला सुरूवात केली. त्यावेळी त्यांना  एका हॉटेलमध्ये या जबरी चोरीतील एक संशयित काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमसह तेथे जाऊन करण वाघमोडे याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने आपल्या तीन साथीदारांसमवेत हॉटेल मराठा पॅलेसमध्ये जबरी चोरी केल्याचे सांगितले. याचे कारण विचारले असता. वाघमोडे याचा मित्र मराठा पॅलेसमध्ये पूर्वी काम करत होत्या. त्यावेळी त्याच्या मालकासोबत त्याचा वाद झाला होता. या वादातून बदला घेण्यासाठी त्यांनी जबरी चोरीचा बेत आखल्याची कबुली दिली. करण वाघमोडेकडे सापडलेले दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात पुढे आले असून, त्याने मित्राच्या मदतीने गोडोलीतून ही दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या दोन सहकाऱ्यांना देखील स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांकडून एका साथीदाराचा शोध सुरु आहे.

या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग साबळे, सागर वाघ, नानासाहेब कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक डी. वाय. कदम, शिवाजी भिसे, धीरज कुंभार, अभय साबळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष कचरे, विशाल धुमाळ, पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, जोतीराम बर्गे, मोहन नाचन, योगेश पोळ, राजुमार ननावरे, नितीन भोसले, संतोष जाधव, प्रवीण कडव, धीरज महाडिक, केतन शिंदे, मयूर देशमुख, पंकज बेचके, विनोद गायकवाड यांनी सहभाग घेतला.

No comments