Header Ads

फलटण न्यायालयातील पब्लिक प्राँसिक्युटर १० हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात crime

सातारा : तक्रारदार यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे त्यांचे पती, सासु, सासरे यांचे विरुद्ध आयपीसी ४९८ अ प्रमाणे तक्रार दाखल केली होती. फलटण न्यायालयात इतर प्रलंबित केसेस लवकरात लवकर निकाली काढण्याकरीता श्रीमती. आकांशा कमलेश्वर रणवरे, पब्लिक प्रॉसिक्युटर, फलटण कोर्ट, रा.गजानन चोक, नारळीबाग फलटण ता.फलटण जि.सातारा यांनी तक्रारदार यांचेकडे १५,०००/- रुपयांची लाच मागणी केलेबाबतची तक्रार दि.०३/०२/२०२० रोजी दिली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार दिनांक ०३/०२/२०२० रोजी केले पडताळणी कारवाईमध्ये श्रीमती. आकांक्षा कमलेश्वर रणवरे, पब्लिक प्रॉसिक्युटर, फलटण कोर्ट, रा.गजानन चौक, नारळीबाग फलटण ता.फलटण जि.सातारा यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांना आयपीसी ४९८ अ प्रमाणे तक्रार दाखल केलेली व फलटण न्यायालयात इतर प्रलंबित केस तसेच इतर प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याकरीता तडजोडी अंती २०,०००/- रुपये रक्कम दोन टप्प्यात लाच मागणी करुन त्या लाच रक्कमेतील एक टप्पा १०,०००/- रुपये आज दि.१०/०२/२०२० रोजी आयोजित केले सापळा कारवाईमध्ये श्रीमती. रणवरे, मॅडम, पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी स्विकारल्यानंतर त्यांना फलटण न्यायालयातील त्यांचे कार्यालयात पकडण्यात आले असून त्यांच्या विरूध्द फलटण शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सरू आहे.

सदरची कारवाई राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक तसेच श्रीमती सुषमा चव्हाण अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथील पोलीस उपअधीक्षक श्री.अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक, श्री.अविनाश जगताप, सहा.फो.आनंदराव सपकाळ, पोलीस हवालदार विजय काटवटे, संजय साळुखे, पो.ना. संजय अडसुळ, प्रशांत ताटे, विनोद राजे, मपोना श्रद्धा माने, पो.कॉ.संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले, निलेश वायदंडे, म.पो.कॉ.शितल सपकाळ यांनी केली.

No comments