Header Ads

शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुखपदी पूनम कार्वे यांची निवड; सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवणार : कार्वे

सातारा : सातारा तालुक्यातील सर्वसामान्यांसह महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही शिवसेनेच्या सातारा महिला तालुका प्रमुख पूनम कार्वे यांनी दिली. शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुखपदी निवड झाल्यानंतर सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महिला जिल्हाप्रमुख शारदा जाधव, मयुरी दौडे, ललिता वालगुडे, पूनम बागल, स्वाती कदम आदी उपस्थित होत्या.

कार्वे पुढे म्हणाल्या, सातारा तालुकयातील गावोगावी शिवसेनेचे संघटन कौशल्य बांधणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या योजना तळागाळात पोहचवणार आहे. तालुक्यातही गावोगावी शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे पोहचवून संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे. महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे कार्वे यांनी सांगितले.

No comments