Header Ads

विधानसभा निवडणुकीआधी भाजपची वाट धरलेल्या आ.शिवेंद्रराजे व आ.जयकुमार गोरेंच टायमिंग चुकलं satara

सातारा : राज्यात महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार येणार आहे. या सत्तांतरामुळे विधानसभा निवडणुकीआधी सातारा जिल्ह्यातील पक्षांतर केलेल्या अनेक नेत्यांना मोठा फटका बसला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. मात्र या नेत्यांचा अंदाज चुकल्याने सत्तेच्या लोभापाई शिवसेना-भाजपमध्ये गेलेल्या या नेत्यांची निराशा झाली असून त्यांना विरोधातचं बसावं लागणार आहे. सातारा-जावळी विधानसभा मतदार संघाचे तात्कालीन राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले व माण-खटाव विधानसभा मतदार संघाचे तात्कालीन कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षात माजी खासदार उदयनराजे यांच्याशी फारसं पटत नसल्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिवेंद्रराजेंपाठोपाठ उदयनराजेंनीही भाजपवासी झाले. शिवेंद्रराजे निवडून देखील आले मात्र महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होत असायाने त्यांची मंत्रिपदाची संधी गेली. भाजपच्या शेवटच्या मेगाभरतीमध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसमध्ये सातारा जिल्ह्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांचं नाव होतं. जयकुमार गोरे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. मात्र त्यांना देखील विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. हे दोन्ही नेते महाविकास आघाडी सरकारमध्ये असते तर त्यांना किमान राज्यमंत्रीपद मिळालं असतं.

1 comment: