Header Ads

शिक्षकानेच केले विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य ; वडूज येथील घटना satara

सातारा : वडूज (ता.खटाव) परिसरातील एका संस्थेच्या आश्रम शाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली. या घटनेमुळे खटाव तालुक्‍यात संतापाची लाट उसळली असून संबधिताला तातडीने अटक करावी अशी मागणी होत आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या भावाने वडूज पोलीस ठाण्यात प्रसाद अशोक गलांडे (रा.भवानी नगर वडूज, मुळ रा. गोंदवले ता. माण) याच्याविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयिताने त्याचा शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला दि. 20 रोजी रात्री दहाच्या सुमारास पोहे व सरबत करण्यास सांगितले होते. त्यानंतर पीडित मुलाने पोहे व सरबत संशयिताच्या खोलीत आणल्यानंतर त्याने खोलीचा दरवाजा लावून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. पीडिताने याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर संशयितावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पाटील करत आहेत.

No comments