Header Ads

तंजावर, तामिळनाडू येथील पहिले मराठा छत्रपती श्री.व्यंकोजीराजे यांचे थेट बारावे वंशज श्री.विक्रमसिंह राजेभोसले यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन satara

सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सख्खे सावत्र बंधू आणि तंजावर, तामिळनाडू येथील पहिले मराठा छत्रपती श्रीमंत व्यंकोजी राजे यांचे थेट बारावे वंशज असलेले श्रीमंत विक्रमसिंह राजाराम राजेभोसले यांचे आज चेन्नई येथे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले युवराज प्रताप सिंह, युवराज मालोजीराजे आणि दोन मुली राजलक्ष्मी राजेश राजेशिर्के, अरुणाराजे कृष्णराजे महाडिक आणि त्यांच्या पत्नी मधुमाला असा परिवार आहे.

तंजावर येथील थोरला राजमहाल, हुजूर महाडी त्यांचे अधिपत्या खाली होता. कला, संस्कृती, समाजकारण आणि समाज उत्थानाचा थेट वारसा त्यांना जणू परंपरागत लाभलेला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी मंदिर उभारणी असेल, शाळे साठी मदत असेल किंवा गरिबांना मदत असेल अशी अनेक समाज उभारणीचे कार्य घडविले. सध्याचे तंजावर छत्रपती श्रीमंत बाबाजीराजे भोसले यांचे ते सख्खे काका आणि समस्त तंजावर भोसले परिवाराचे ते आधारवड आणि मार्गदर्शक होते.

No comments