Header Ads

सातारा शहरातील गुरुवार पेठेत पाण्याच्या टाकीत पडून बालिकेचा मृत्यू satara

सातारा : सातारा शहरातील गुरुवार पेठ परिसरात घरासमोरच असणाऱ्या पाण्याच्या टाकीत पडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सांयकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रोशनी अमर खान असे पाण्याच्या टाकीत पडलेल्या मुलीचे नाव आहे.

याबाबत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून मिळालेली अधिक माहिती अशी की, अमर खान हे आपली पत्नी आणि मुलगी रोशनी (वय ३) समवेत गुरुवारपेठ परिसरात राहत होती. तिचे वडील मजूरी करतात. रविवारी ते घरी नव्हते. आई आणि ती एकटीच घरी होती. त्यांच्या घरासमोर पाण्याची टाकी असून ती भरलेली होती. रविवारी ती नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर खेळत होती. घरासमोर खेळत असताना ती अचानकपणे पाण्याच्या टाकीत पडली. ही घटना लवकर कोणाच्या लक्षात आली नव्हती. ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी तिला तत्काळ बाहेर काढण्यात आले. रोशनीला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

No comments