Header Ads

सातारा शहरातील मल्हारपेठ येथे झालेल्या दुचाकी व रिक्षाच्या अपघातात एक ठार satara

सातारा : सातारा शहरातील मल्हार पेठेतील हनुमान मंदिराजवळील एका कापड दुकानासमोर दुचाकी आणि ॲपेरिक्षाच्या धडकेत एकजण जागीच ठार झाला. या दूर्घटनेत अन्य एकजण जखमी झाला असून रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घडली असून धनंजय शिंदे असे त्यांचे नाव आहे.

याबाबत जिल्हा रुग्णालयातून मिळालेली अधिक माहिती अशी की, धनंजय विठ्ठल शिंदे (वय ५०, रा. फ्लॅट नंबर चार, गीतांजली अपार्टमेंट, विसावा पार्क, सातारा. मूळ रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे सातारा एमआयडीसीत कामाला होते. रविवारी सुट्टी असल्याने ते मित्राला भेटायला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. यानंतर ते मेहूणे संजय यांना घेऊन राजवाडा येथील मित्रास भेटायला गेले. त्यांना भेटून ते विसावा नाका येथील घरी येत होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते मल्हारपेठ चौकात असणाऱ्या हनुमान मंदीर येथे आले असता एका कापड दुकानाच्या समोर त्यांच्या दुचाकीची आणि ॲपे रिक्षाची जोराची धडक बसली. ही धडक भीषण होती की ते पुन्हा रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या एका रिक्षाला जाऊन धडकले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या अपघातात त्यांचे मेहूणे संजय हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

No comments