Header Ads

शरद पवार उद्या कराड दौऱ्यावर satara

सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या दि.२५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे सुप्रीमो खा.शरद पवार कराड येथे येणार आहेत. सकाळी ८ वाजता स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रीतिसंगमावरील समाधीस पवार अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वाजाता आ.बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास ते उपस्थित राहतील. दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना होतील अशी माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.

No comments