Header Ads

फोटो काढण्याच्या नावाखाली चैन लंपास satara

सातारा : मी दूधवाल्या आप्पांचा मुलगा आहे असे सांगून दोन युवकांनी विक्रांतनगर (संभाजीनगर) येथे एका महिलेच्या घरात प्रवेश केला आणि 'तुमच्या पतीच्या गळ्यातील चैन खूप छान दिसते. त्याचा एक फोटो काढू या,' असे म्हणत चाळीस हजार रुपयांची चैन लंपास केल्याची घटना रविवारी भरदिवसा घडली. या घटनेमुळे विक्रांतनगर आणि संभाजीनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, विक्रांतनगर (संभाजीनगर) येथील बेगम इस्माईल मुल्ला या शनिवारी दुपारी दोन वाजता आपल्या पतीसमवेत घरामध्ये बोलत बसल्या होत्या. याचवेळी पंचवीस ते तीस वयोगटातील दोन मुले घराच्या बाहेर आली आणि त्यांनी मी दुधवाल्या आप्पांचा मुलगा आहे, असे सांगत घरात प्रवेश केला. यावेळी बराचवेळ गप्पा रंगल्या. काही वेळानंतर दोघांनीही गप्पा मारत असतानाच बेगम मुल्ला यांच्या पतीला 'तुमच्या गळ्यातील चैन खूप छान दिसतेय. त्याचा एक फोटो काढू, असे म्हणत फोटो काढला आणि हातोहात त्या दोन युवकांनी चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केली. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

No comments