Header Ads

लोणंद-नीरा रोडवरील खड्ड्याने घेतला एकाचा बळी khandala

लोणंद : नीरा ते लोणंद रोडवर जुन्या टोलनाक्यासमोर रस्त्यावरील मोठा खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात चालकाच्या मागे बसलेल्या एकजणाचा मृत्यू झाला. राजेंद्र चंद्रकांत भोगळे (रा. साकुर्डे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत्यू झाल्याचे नाव आहे. तसेच या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालक नीलेश पांडुरंग कामठे (रा. शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्यावर लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, बसचालक हाजीमलंग चंदनशिवे हे मंगळवारी स्वारगेट ते मंगळवेढा अशी एसटी घेऊन जात असताना नीरा-लोणंद जाणाºया रोडवर जुना टोल रोडवर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पुढे चाललेली दुचाकी (एमएच १२ क्यूएन ७७२४) वरील चालक नीलेश पांडुरंग कामठे (रा. शिवडी ता. पुरंदर) याने वाहन निष्काळजीपणे बेदरकारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवल्याने व रोडवर असणारा मोठा खड्डा न पाहता दुचाकी आदळून झालेल्या अपघातात स्वत: जखमी होऊन तसेच पाठीमागे बसलेला राजेंद्र्र चद्रकांत भोगळे याच्या मृत्यूला कारणीभूतप्रकरणी नीलेश कामठे याच्याविरुद्ध बसचालक हाजीमलंग चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे.दरम्यान, या मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन खड्डे मुजवावेत, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

No comments