Header Ads

पोवई नाक्यावर जुगार अड्ड्यावर छापा ; दोघांना अटक crime

सातारा : सातारा शहरातील पोवई नाका येथील दूध संघानजीक एका टपरीखाली सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोवई नाका ते पारंगे चौक दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर असलेल्या दूध संघानजीक एका पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा तेथे धाड टाकली. यावेळी पोलिसांनी झाकीर हुसेन शेख आणि कुमार आण्णा एटापल्ली या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरुन ९८५ रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले आहे.

No comments