Header Ads

वाईच्या पश्चिम भागातील नुकसानीचे स्वरूप भीषण नुकसान भरपाईसाठी मदन भोसले यांचा पाठपुरावा wai

वाई : अतिवृष्टीमुळे वाई तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या नुकसानीचे स्वरूप भीषण आहे. या परिसरातील पीकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्यासोबत या परिसरातील वाहून गेलेली शेती, ताली, घरांचे झालेले नुकसान, पडलेले वीजेचे पोल याचीही तातडीने दुरूस्ती होण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती माजी आमदार मदन भोसले यांनी दिली.

गेले चार दिवस मदन भोसले यांनी मांढरदेवसह वाई तालुक्याच्या पश्चिम भागात विविध भागात जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अनेक प्रश्नांबाबत संबंधित मंत्री, अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कामांना चालना देत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी गेली दोन दिवसात कोंढवली, आकोशी, गोवेदिगर, वासोळे, वाशिवली, भिवडी, जांभळी, खावली, वडवली, रेणावळे, आसरे, वेलंग, उंबरवाडी, धोम, अभेपुरी, पाचपुतेवाडी, वडाचीवाडी, गाढवेवाडी, मांढरेवाडी, वरखडवाडी, पांडेवाडी, भोगांव, मेणवली, शेलारवाडी, सुलतानपूर आदी गावांना भेट दिली. या भेटीत परिसरातील विविध गावांत झालेल्या शेतपिकांचे नुकसान, पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे ओढ्या-नाल्यांनी बदललेली दिशा त्यामुळे वाहन गेलेल्या ताली व शेती, खचलेले पुल, पडलेले वीजेचे पोल आदी झालेले प्रचंड नुकसान यावर तातडीने उपाय योजना व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः पिकांच्या नुकसानीबाबत योग्य ती भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी प्रयत्न करू असे सांगून त्यांनी जनतेला दिलासा दिला. दरम्यान, महसुल, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी जाग्यावरून संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती देऊन उपाय योजना करण्याची मागणी केली. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब शिंदे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, वाईचे माजी उपसभापती चंद्रकांत शेलार, पंचायत समिती सदस्य दिपक ननावरे, रोहिदास पिसाळ, अशोकबुवा पाटणे, दिलीप वाडकर, राजभाऊ शेलार, राजाराम सणस, किसनराव चिरगुटे, मोहन सणस, विजय ढेकाणे, नगरसेवक महेंद्र धनवे, राकेश फुले, दत्ता ढेकाणे, संतोष जमदाडे, संदिप कोरडे, अशोक वाडकर, रामचंद्र वीरकर, अभिजित शेलार, विठ्ठल फणसे, बाबा फणसे, मदन पोळ, प्रशांत पोळ, विकास जमदाडे, संजय देशमुख, सागर जमदाडे, राजेद्र शिर्के, भगवान महांगडे, सचिन भोसले, प्रशांत नागपुरकर, सचिन गांधी, देवानंद शेलार, ऋषिकेश बाबर, सागर मांढरे, प्रदिप भोसले, संतोष चौधरी आदी उपस्थित होते.

कधी पायी तर कधी दुचाकी

वाई तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम व डोंगराळ आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी मदन भोसले यांनी कधी दुचाकीवर जाऊन तर कधी पायी चालत जाऊन पाहणी केली. मदन भोसले यांच्या या दिलासादायी पाहणी दौऱ्याबद्दल स्थानिक जनतेने समाधान व्यक्त केले. 

No comments