Header Ads

पुरग्रस्तांच्या हुंदक्यांना 'किसन वीर'च्या मदतीचा बांध ; 'किसन वीर'ने घेतले दह्यारी गाव एक महिन्यासाठी दत्तक wai

भुईंज : दह्यारी पलुस तालुक्यातील एक हसत खेळत गांव नुकत्याच झालेल्या पावसाने या गावाला भयंकर पुराने वेढलं अन काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं, आख्खं गावं पाण्यात गेलं. डोळ्यादेखत संसार बुडताना अनेकांना अश्रृंचे बांध फुटले. अशा अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी दह्यारी ग्रामस्थांना गरज आहे, ती फक्त न फक्त मदतीची. त्यांच्या या अस्मानी संकटाला दुर करण्यासाठी किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले व त्यांच्या व्यवस्थापन पुढे सरसावले असून माणुसकीच नातं जपत दह्यारी गाव एक महिन्यासाठी दत्तक घेऊन पुरेल एवढया जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करित पुरग्रस्तांच्या हुंदक्याना मदतीचा बांध घालुन खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

कोल्हापुर, सांगली सातारा येथे झालेल्या निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा अनेक गावांना फटका बसला. पुरग्रस्त गावांना मदत करण्यासाठी राज्य सरकार, विशेषतः राज्याचे सहकार मंत्री व सांगलीचे पालकमंत्री सुभाषराव देशमुख यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना एक पुरग्रस्त गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. यावर किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी तात्काळ पुरग्रस्तांची गरज आणि सहकारमंत्र्याचे आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या सुचनेनुसार दह्यारी तालुका पलुस जि. सांगली या गावाला दत्तक घेऊन तत्काळ एक महिन्यांच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून पूरग्रस्तांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात दिला आहे. क्रांती साखर कारखान्याचे माजी संचालक व दह्यारी गावचे श्रीरंग पाटील म्हणाले की, पुरपरिस्थितीमुळे आमच्या गावावर जी भीषण परिस्थिती ओढवली आहे. अशा परिस्थितीत किसन वीरचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी आमच्या गावाला दत्तक घेऊन केलेली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे. याबद्दल दह्यारी ग्रामस्थांच्यावतीने मी त्यांचे आभार मानतो.

पुरपरिस्थितीमुळे विशेषतः महिलांचे आरोग्य धोक्यात आलेले असून सातारा येथील प्रियदर्शिनी क्लब व सातारकर यांच्यावतीने डॉ. सुरभि भोसले-चव्हाण यांनी महिलांनी आरोग्य किट व संसार उपयोगी साहित्याचे वाटप केले. महिलांनी आपल्या आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थित महिलांना सविस्तर माहितीही दिली. कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर म्हणाले, गंभीर पुरपरिस्थितीमुळे बहुतांश कुटुंबाचे जीवनमान अडचणीत आले आहे. किसन वीरचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी सहकार मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तातडीने दह्यारी गावाला दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. संचालक नंदकुमार निकम म्हणाले, या पुरपरिस्थितीमुळे सर्वसामान्यांचीही पुरती दैना झाली आहे. येथील परिस्थिती पाहिल्यानंतर पुराची गंभीरता लक्षात येत असून कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी क्षणाचाही विलंब न करता कर्तव्य भावनेतून दह्यारी गावासाठी एक महिना पुरेर एवढा जीवनाश्यक वस्तु सोबत पाठविल्या आहेत. यावेळी दह्यारी येथील जिल्हा परिषद सदस्या सौ. अश्विनी पाटील, सरपंच सौ. सुषमा पाटील, उपसरपंच सौ. प्रतिभा पाटोळे, बाजार समितीचे संचालक मिलिंद पाटील, माजी उपसरपंच सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य बंडा पाटील, सहाय्यक निबंधक अमोल डफळे, ग्रामसेविका श्रीमती एस. एस. ढवणे, तलाठी श्रीमती एस. एस. पवार, सातारा येथील उद्योजक ऋतुराज चव्हाण, डॉ. सुरभि भोसले-चव्हाण, कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, नंदकुमार निकम, सचिन साळुखे, मधुकर नलावडे, प्रकाश पवार, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, अरविंद कोरडे, जयवंत साबळे, डॉ. दत्तात्रय फाळके, सेक्रेटरी एन. एन. काळोखे, एच आर मॅनेजर ए. टी. शिंगटे, परसेच ऑफिसर राजेंद्र भोईटे, दह्यारी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments