Header Ads

सन २०१८ चे जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर ; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्या वितरण sport

सातारा : जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती, सातारा निवड समितीने सन २०१८ साठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक सावंत प्रविण वरबती (आर्चरी), गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता संतोष मारुती कांबळे(क्रीकेट), गुणवंत खेळाडू (पुरुष प्रवर्ग) ऋषिकेश अरविंद गुजर (आर्चरी), गुणवंतर खेळाडू (महिला प्रवर्ग) कु. मोरे प्रतिक्षा लक्ष्मण (मल्लखांब), व गुणवंत खेळाडू (दिव्यांग) कु. वनिता बबन शितोळे (मैदानी स्पर्धा) या गुणवंत खेळाडू व गुणवंत क्रिडा कार्यकर्ता, संघटक म्हणून जिल्हा क्रीडा  पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते दि. १५ ऑगस्ट २०१९ रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर होणार आहे. या जिल्हा निवड पुरस्कार समितीमध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सुजित शेडगे शिवछत्रपती पुरस्कार्थी, सिध्दार्थ लाटकर गणुवंत क्रिीडा कार्यकर्ता, संघटक पुरस्कार्थी, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग व युवराज नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा हे होते. पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, रक्कम रुपये १०,०००/- असेआहे.

No comments