Header Ads

मेढा नगरपंचायतीचा आपत्कालीन कक्ष गायब ; मुसळधार पावसाने ओढ्यांना पाणी वाढले satara

सातारा : जावली तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेढा नगरपंचायतीचा आपत्कालीन कक्षच स्थापन नसल्याने नगर पंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असुन पावसाने हाहाःकार माजवला असताना मेढ्यातील आठ ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मेढ्यातील ओढे वाहत तुडुंब भरून वाहत असुन नगरपंचायतीचे अधिकारी व नगरसेवक बघ्याची भुमीका घेत असल्याचे चित्र आहे. नगर पंचायत ओढ्यात कोणीतरी वाहून जाण्याची वात पाहात आहे का ? तसेच येथील कोणाचा जीव गेल्यानंतर नगर पंचायतीची यंत्रणा कामाला लागणार का ? असा प्रश्न आता मेढ्यातील नागरिक विचारू लागले आहेत.

मेढा नगरपंचायतीला मुख्याधिकारी नसल्याने, स्थानिक स्वराज्य संस्थेचा खेळखंडोबा झाला असतानाच मेढा-सातारा रस्त्यावर असलेले रेस्ट हाऊस , पठानचा ओढा, आंबेडकर नगर, पवार टोवर, गांधीनगर तसेच वार्ड क्रमांक ७ मधील मुख्य ओढ्यानी धोक्याची पाणी पातळी ओलांडली आहे. ओढे वाहतअसताना गावातील मुख्य रस्त्यावरील तसेच अंतर्गत वीज पुरवठा बंद असल्यामुळे कोणताही धोका निर्माण होवु शकतो. मेढा शहरातील गांधीनगरमध्ये डोंगराकडुन येणारा पाण्याचा प्रवाह वाढल्याने कातकरी वस्तीतील लोक जीव मुठीत घेवुन दिवस ढकलत आहेत. मेढ्यातील आठ ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असताना मेढा नगरपंचायतीचा आपत्कालीन कक्ष गायब असून, मेढा शहरात जीवीतहानीचा प्रकार घडल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरीक विचारू लागले आहेत.

No comments