Header Ads

पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंची मदत करा ; जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे आवाहन satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पुरपरिस्थिती आहे. या पुरपरिस्थीतीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुचीं मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केल आहे. पुरग्रस्तबाधीतांना सुरक्षेच्या कारणास्वत त्यांना हलवून तात्पुरती निवाऱ्याची सोय केली आहे. या पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुची मदत करावी. ही मदत ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कराड आणि पाटणमध्ये एनडीआरएफची टीम युद्ध पातळीवर काम करीत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी ब्लॅकेंट, धान्य, बिस्कीटे यासह जीवनावश्यक वस्तुंची मदत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज आर्ट ऑफ लिव्हींग, किराणा रिटेल असोसिएशन सातारा, कॉम्प्युटर व मीडिया डिलर असोसिएशन, सातारा यांच्यामार्फत अन्नधान्य व साहित्यांचे वितरण करण्यात आले. तसेच पाटण येथील पुरग्रस्तांसाठी तांदूळ, डाळ, बिस्कीटे, पाणी, कपडे इत्यादी साहित्य पाठविण्यात आले आहे.

No comments