Header Ads

नवीन रास्तभाव दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित satara

सातारा : सार्वजनिक वितरण प्राणाली अंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधावस्तु शिधापत्रिकाधारकांना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने अस्तित्वात असलेली शिधावाटप दुकाने काही कारणास्तव रद्द करुन किंवा त्या क्षेत्रातील वाढ झाल्यामुळे नवीन रास्तभाव/शिधावाटप दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे. त्यानुसार संस्था अर्ज करण्याची मुदत 10 सप्टेंबर, नवीन दुकानाकरीता प्राप्त झालेल्या, अर्जाची प्राथमिक तपासणी, जागेची तपाणी व इतर अनुषंगिक कार्यवाही 10 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करणे, 25 ऑक्टोबर पर्यंत नवीन दुकाने मंजुर करण्यात येणार आहेत.

पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत सहकारी संस्था, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिला सहकारी संस्था नवीन रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजुर करण्यात येणार आहेत. याबाबत काही शंका असल्यास संबंधित तहसीलदार अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.

No comments