Header Ads

कोरेगाव-सातारा रस्त्यावर असलेल्या थांब्यावर बस न थांबल्यास पुन्हा रास्ता रोको करणार : रमेश उबाळे satara

कोरेगाव : कोरेगाव-सातारा रस्त्यावर असलेल्या शिरढोणफाटा, मुगावफाटा, भिवडी, त्रिपुटी या थांब्यांवर सर्व एस. टी. महामंडळाच्या बस थांबवा.असा आदेश तहसीलदार शिंदे यांनी देऊनही अद्याप बस थांबत नसल्याने  भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी पुन्हा एकदा एस.टी.महामंडळाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घ्यावा असेही उबाळे म्हणाले.

कोरेगावमधून एस.टी. महामंडळाच्या बसेस थेट सातारा येथे थांबत असल्याने शिरढोण, मुगाव, लहसुर्णे,मंगळापूर,तांदुळवाडी येथील प्रवाशी विद्यार्थ्यांना शिरढोणफाटा, मुगावाफाटा, त्रिपुटी, भिवडी येथील थांब्यावर तासनतास थांबावे लागत आहे. याविरुद्ध नुकतेच भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.दरम्यान याचा रस्त्याने तहसीलदार शिंदे कोरेगावकडे निघाल्या होत्या त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून संबंधित महामंडळाच्या अधिकाऱ्यांना संबधीत थांब्यावर बस थबविण्याचे आदेश दिले होते. परंतु पूर्वीप्रमाणे बस साताऱ्याकडे निघून जात असल्याने विद्यार्थी, विद्यार्थीनीना पूर्वीसारखे एस.टी.बसची तासनतास वाट पहावी लागत आहे.त्यामुळे भजयुममोच्या वतीने पुन्हा एकदा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रमेश उबाळे यांनी दिला आहे. कोरेगाव, सातारा येथे महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पास काढले आहेत.  परंतु एस.टी.बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना अखेर वडापचा अधार घ्यावा लागत आहे.परिणामी विद्यार्थ्यांना हा फुकटचा भुरदंड सोसावा लागत असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महामंडळाने निर्णय न घेतल्यास आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहे त्यामुळे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन बस संबंधित थांब्यावर बस थांबवून विद्यार्थ्यांची सोय करावी.अशी आमची मागणी आहे.असेही उबाळे म्हणाले.

No comments