Header Ads

आपत्कालीन स्थिती कायम असलेल्या ५ तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना दि.९ रोजी सुट्टी जाहीर satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यात अजूनही कायम असलेली आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन विशेषत: पश्चिमेकडील अति पर्जन्यमान असलेल्या महाबळेश्वर, जावळी, पाटण, कराड आणि वाई या 5 तालुक्यात शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सर्व शाळा तसेच महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली आहे. इतर 6 तालुके सातारा, खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव येथील शाळा व महाविद्यालये सुरु राहतील,असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

No comments