Header Ads

पुरग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करा ; जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना चार लाख मदत देणार : पालकमंत्री विजय शिवतारे satara

सातारा : पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना नुकसानीचे पंचनामे करुन योग्य ती मदत केली जाईल, तसेच जिवितहानी झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्याचे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज दिले. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज कराड येथील दत्त चौक आणि पाटण कॉलनी येथील पहाणी केल्यानंतर कराड नगरपरिषद शाळा क्र. ३ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, प्रातांधिकारी हिम्मत खराडे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कराड आणि पाटण पूरपरिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची टीम कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच कर्नाटक येथील अलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत शासन वेळोवेळी संपर्क साधत आहे. अलमट्टी धरण व्यवस्थापकांकडून 3 लाख 60 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज कोयना धरणातून 67 हजार क्यूससेक पाण्याचा विसर्ग सरु आहे. शासनाचे पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष असल्याचे त्यांनी योवळी सांगितले. दत्त चौक व पाटण कॉलनी येथे भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होवू नये म्हणनू संरक्षक भिंतीचे काम सरु करण्यात आले होते. काही कारणास्तव हे काम बंद पडले आहे. हे काम सुरु करण्यासाठी या कामाचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. त्यांना तांत्रिक मान्यता देवून तात्काळ काम सुरु केले जाईल. पावसाळा संपताच छोटया छोटया धरणांचे ऑडिट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आपत्ती काळात जिल्हा प्रशासनाने तप्तरतेने काम केले आहे. असे सांगून पालकमंत्री शिवतारे पुढे म्हणाले, पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची शक्यता असते ती रोगराई पसरणार नाही यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व ती काळजी घेण्यात आली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना शासन नियमानुसार योग्य ती मदत दिली जाणार असून पिकांच्या नुकसानीचेही पंचनामे करुन मदत दिली जाणार आहे.

पालकमंत्र्यांनी साधला पूरग्रस्तांशी संवाद

कराड तसेच पाटण तालुक्यातील पूरग्रस्त बाधितांना कराड येथील नगर परिषदेच्या शाळा क्र. 3 मध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.  पूर बाधितांची पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी  भेट घेवून आस्थेवाईकपणे चौकशी केली. योवळी  पूरग्रस्तांनी आमची शासनाने दखल घेतली आहे. प्रशासनाकडून आम्हाला दोन वेळचे जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी तसेच आमच्या आरोग्यचीही काळजी घेतली आहे. तसेच आमच्या लहान मुलांसाठी दुधाची सोयही केली आहे. असे यावेळी पूरग्रस्तांनी श्री. शिवतारे यांना सांगितले.

No comments