Header Ads

ल्हासुर्णे येथे पावसामुळे तीन घरांच्या भिंती खचल्या ; घरांचे पंचनामे करण्याची रमेश उबाळे यांची मागणी satara

सातारा : ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथे अतिपावसामुळे तीन घराच्या भिंती खचल्याने या घरामध्ये राहणाऱ्या  घरातील कुटुंबियांचे प्राण धोक्यात आहेत. तत्पूर्वी प्रशासनाने वेळेत लक्ष घालून या घरांचे पंचनामे करून शासकीय मदत तसेच संबधीत कुटूंबियांना घरकुल बांधून द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी केली असून आपण तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.

याबाबत बोलताना रमेश उबाळे म्हणाले, ल्हासुर्णे येथिल मागासवर्गीय वस्तीत तीन घरांमध्ये एकच भिंत आहे. ही भिंत फार जुनी आहे. या तीन  घरांमध्ये एकूण आठ ते दहा लोक रहातात. समीर बाबू उबाळे,अल्का समीर उबाळे, कुसुम मोहन उबाळे, सचिन मोहन उबाळे, गणेश मोहन उबाळे, हिम्मत नारायण उबाळे, गौतमी हिम्मत उबाळे, रवींद्र श्रीरंग उबाळे, हेमलता श्रीरंग उबाळे अशी त्यांची नावे आहेत. तीन घरांमध्ये असलेली एकच भिंत नुकत्याच झालेल्या अतिपावसामुळे खचली असून पडण्याच्या अवस्थेत आहे. ही भिंत पडलीतर कदाचित यामध्ये जीवितहानी होऊ शकते. ल्हासुर्णे येथील कार्यरत असलेले तलाठी यांनी आजचेआज संबंधित तिन्ही घरांचे पंचनामे तयार करून या घरांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव करून द्यावा. यासाठी आपणही संबंधित अधिकारी, शासकीय कर्मचाऱ्यांना भेटून शासनाकडून आर्थिक मदत व घरकुल मिळण्यासाठी  यांना भेटणार आहे. या तिन्ही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता अतिष्य बेताची आहे.कमवितेही कुणी नसल्याने त्यांना स्वतःचे घर बांधणे शक्य नाही. हे कुटुंब कसाबसा आपला उदरनिर्वाह कसाबसा करतात प्रशासनाने हा विषय प्रलंबित ठेवलेस येथे एखादी अनर्थ घटना घडून जीवितहानी होऊ शकते त्यामुळे वेळेत लक्ष घालून या कुटुंबियांना आर्थिक मदत व घरकुल बांधून मिळावे. अशी आमची मागणी आहे. असेही रमेश उबाळे यावेळी म्हणाले. प्राथमिक स्तरावर ल्हासुर्णे येथे कार्यरत असणारे तलाठी, ग्रामसेवक यांनी लक्ष घालून संबंधित घरांचे पंचनामे करावेत अशी मागणी करून उबाळे पुढे म्हणाले, सुमारे आठ ते दहा लोकांचे जीव आज धोक्यात आहेत. रात्रीच्या वेळी या घरातील काही अळीपाळीने झोपण्याचीव जागरण करण्याची वेळ आली आहे. असेही उबाळे यांनी यावेळी नमूद केले.

रमेश उबाळे यांनी दिले कुटूंबियांना स्वतःचे घर
साताऱ्यात आपल्या उद्दोग,व्यवसायानिमित्त रमेश उबाळे राहण्यासाठी आहेत. त्यांचे ल्हासुर्णे येथेही एक जुने  घर आहे. या घरांची झालेली दुरवस्था पाहून रमेश उबाळे यांनी या कटुबियांना आपले स्वतःचे घर राहण्यास दिले आहे. उबाळे यांच्या दातृत्वाची चर्चा लहसुर्णे येथे होत आहे.

No comments