Header Ads

अस्मितावादी राजकारणासाठी ही बहुविधता अडथळा : प्रा.डॉ.रणधीर शिंदे satara

सातारा : भारतातील बहुविध संस्कृती नष्ट करण्यासाठी हितसंबंधी वर्गाकडून प्रयत्न सुरु आहेत. अस्मितावादी राजकारणासाठी ही बहुविधता अडथळा ठरत आहे. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी येथे बोलताना केले. जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक क्रांतीवीर कॉ. शेख काका आणि शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने सातारा येथील पाठक भवनात झालेल्या अभिवादन सभेत  प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांचे " अस्मितांचे राजकारण व भारतीय लोकशाही " या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर होत्या. परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती , सातारा यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विचारमंचावर विजय मांडके होते.

जातीसंवर्धन , जातीअस्मिता ही नव्या राष्ट्रवादाला आयतीच भुमी मिळाली आहे. जातीसंघटनांचे नव्हते प्रारुप समाजकारण व राजकारणात आले आहे. जात घरातून रस्त्यावर आली आहे असे सांगुन प्रा डॉ रणधीर शिंदे म्हणाले की अस्मितांचे राजकारण हिंसक , झुंडशाही चे , आक्रमक बनले आहे. त्याला राजकारणी पाठबळ देत आहेत. महापुरुषांचे दैवतीकरण केले जात आहे. प्रतिकांचा , मिथकांचा वापर करुन नवे ताणतणाव निर्माण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी कॉ शेख काका व शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले. विजय मांडके यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येस जबाबदार असणारांना पकडण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याबद्दल खेद व्यक्त केला. आभार उदय चव्हाण यांनी मानले. यावेळी डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, कॉ. किरण माने, किशोर बेडकिहाळ, दिनकर झिंब्रे, प्रा.डॉ.शिवाजी पाटील, वर्षा देशपांडे, शैला जाधव, प्रा.दत्ताजीराव जाधव, प्रा.सुनिल गायकवाड, दिलीप भोसले, प्रा.सुर्यकांत गायकवाड, प्रा.डॉ.महेश गायकवाड, गणेश दुबळे, गौतम भोसले, मिनाज सय्यद, मिलिंद पवार, शुभम ढाले, नम्रता पिंपळे, रश्मी लोटेकर, भगवान रणदिवे, भगवान अवघडे, विकास ऊथळे, राजन कुंभार आदी बहुसंख्येने ऊपस्थित होते.

No comments