Header Ads

खंडाळा तालुक्यातीलओढा ओलांडताना एकजण गाडीसह गेला वाहून satara

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील पूरस्थिती कायम असून, आज सायंकाळी केसूर्डीतील युवक मोटारसायलवरून ओढ्‍यावरच्या पूल ओलांडत असताना वाहून गेला. पुराच्या पाण्यात

या बाबत अधिक माहिती अशी की,  केसुर्डी ते नायगाव जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावरील पुलावर पुराचे पाणी आले आहे. त्‍यामुळे हा पूल वाहतूकीसाठी बंद झाला आहे, मात्र अशा पाण्यात मोटार सायकल घालण्याचे धाडस  केसूर्डी येथील सतीश सोमा कचरे (वय ४५) याच्या अंगलट आला.  सतीश कचरे याने लोकांच्या समोरच नायगाव ते केसूर्डी ओढयावर आलेल्‍या पूराच्या पाण्यात गाडी घातली. मात्र पाण्याच्या प्रवाहाला वेग अधिक असल्‍याने  पूल ओलांडताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर सतीश वाहून गेला. त्याचे  शोधकार्य  ग्रामस्थ, पोलिस व रेस्क्यू टीमचे जवानांनी सुरू केले आहे.

No comments