Header Ads

माफी असावी ताई, आज मी राखी बांधुण नाही घेऊ शकलो ; ग्रामपंचायात सदस्याची भावनिक पोस्ट satara

सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत तर काहीजण भावनिक आधार देत आहेत. असाच पूरग्रस्तांना आधार म्हणून संगम माहुली ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश कोळपे यांनी अखेरचा पूरग्रस्त आपल्या हक्काच्या घरात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कोणतेही सन, उत्सव साजरे करणार नसल्याचा निर्धार केला आहे. आज १५ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा उत्साह सर्वत्र सुरु असताना कोळपे यांनी आज सकाळी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईला आपल्या पूरग्रस्ताप्रती व्यथा सांगितल्या. कोळपे यांनी सोशल माध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असा मजकूर लिहिला आहे. माफी असावी ताई, आज मी राखी बांधुण नाही घेऊ शकलो, मला माहिती आहे तु खुप रागवली असशील, पण ताई आपल्या सारखे किती तरी भाऊ-बहीण एकमेकांना पुरामुळे भेटू शकले नाहीत त्याचा साठी मी ठरवलं आहे जो पर्यंत ती गावे सरूळीत होत नाही तो पर्यंत मी एक ही सण साजरा करणार नाही.

No comments