Header Ads

जिल्ह्यातील पुरपरिस्थिती आटोक्यात ; सहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल satara

सातारा : काल पासून बऱ्यापैकी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कोयना धरणातील विसर्ग थोडा कमी करण्यात आला आहे. कराड येथील पुराचे पाणी आता ओसरु लागले असून 6 हजार पुरग्रस्तांना सुरक्षीत स्थळी हालवून त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व आरोग्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज दिली. कराड आणि पाटणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली असून पुरग्रस्तांना सुरक्षीत स्थळी हालवण्याचे व त्यांना इतर मदत ही टीम करीत आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये त्यांना कसलीही मदत लागल्यास त्यांनी आपत्ती व्यवस्थानाच्या 02162-232349 या क्रमांकावर संपर्क साधावा त्यांना मदत उपलब्ध करुन दिली जाईल. पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील काही पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत पुरपरिस्थिती पाहून हे पुल वाहतुकीसाठी खुले करुन विस्कळीत झालेले जनजीवन पुर्वत करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले.

90 गावे पुरग्रस्त असून 5 गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याने  कराड तालुक्यातील 4 हजार 258, पाटण तालुक्यातील 786, फलटण तालुक्यातील 549, सातारा तालुक्यातील 465, महाबळेश्वर तालुक्यातील 161 व जावली तालुक्यातील 43 असे एकूण 6 हजार 262 नागरिकांना सुरक्षीत स्थळी हालवण्यात आले आहे. ज्या गावांना पाण्याने वेढले आहे अशा गावांना प्राथमिकता देऊन तेथे एनडीआरफची टीम काम करीत आहे. सध्या एनडीआरएफची टीम कराड आणि पाटणमध्ये पुरग्रस्तांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर काम करीत आहे. zराड आणि पाटणमध्ये पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरफीची व त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासन रात्रंदिवस काम करीत आहे. पुरपरिस्थिती थोडी कमी होत असून रोगराई पसरणार नाही यासाठी आता जिल्हा प्रशासन काम करणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

राज्यातील पुरग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले पुरग्रस्तांचे झालेल्या नुकसानीबाबत शासन योग्य ती मदत करणार असून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य ते निर्णय घ्यावे. पुर ओसरताच रोगराई पसरण्याचे प्रमाण खूप असते रोगराई पसरु नये म्हणून आरोग्य विभागाने युद्धपातळीवर काम करावे. पुरांमुळे पाण्याचे स्त्रोत दुषीत झाले असून नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा.  पुरामुळे विस्थापीत नागरिकांना जेवण, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. पुर ओसरल्यानंतर पुरग्रस्त भागांची  स्वच्छता करावी, असे  सांगून  जीथे जीथे विज पुरवठा खंडीत होत आहे तेथील विज पुरवठा सुरु करावा. तसेच पावसामुळे डोंगर खचत आहे अशा भागांचे पंचनामे करुन तेथील नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवावे तसेच पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामेही करावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली काल कराड येथील पुरपरिस्थितीची पहाणी

कराड शहर आणि तालुक्यातील गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे ही प्राथमिकता जिल्हा प्रशासनाची असेल. शिंदे आळीतील  गणपती बनविणाऱ्या कारागिरांचे जे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे केले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.

No comments