Header Ads

साताऱ्यात ‘डांन्स का पंच' दि.२१ ते ३० दरम्यान वर्कशॉप ; सेलिब्रेटी कोरिओग्राफरकडून मिळणार डान्सचे प्रशिक्षण satara

सातारा : साताऱ्यात डान्सची अनेकांना आवड आहे. त्या आवडीचे रुपांतर कलेत व्हावे यासाठी आमच्या पंकज चव्हाण डान्स ऍकॅडमीच्यावतीने स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ज्या प्रमाणे प्रशिक्षण दिले जाते. तशाच प्रकारचे प्रशिक्षण आमच्या ऍकॅडमीच्यावतीने देण्यात येते. आताही डॉन्सची आवड असणा-यांसाठी खास करुन साताऱ्यात डान्स का पंच हे शिबिर दि. २१ ते ३० या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या वर्कशॉपमध्ये साडेतीन वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचे लोक सहभागी होवू शकतात. सेलिब्रेटी कोरिओग्राफरकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती पकंज चव्हाण डान्स ऍकॅडमीचे संस्थापक आणि कोरिकोग्राफर पंकज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पंकज चव्हाण म्हणाले, सातारा जिह्याला एक नावलौकिक आहे. या जिह्यात अनेक नामवंत कलाकार होवून गेले. डान्सचे प्रशिक्षण देण्यासाठी पंकज चव्हाण डान्स ऍकॅडमी सातत्याने गेली १४ वर्षापासून अविरतपणे प्रशिक्षणाचे धडे देत आहे. या १४ वर्षात प्रशिक्षण देण्यासाठी सरोज खान, सिद्धेश पै, फुलवा खामकर, रोहन रोकडे, रोहित मंद्रूळकर, स्नेहा उधाणी, राघव ज्युयाल, धर्मेश एलांडे, शक्ती मोहन आदींनी साताऱयात येवून मोलाचे मार्गदर्शन दिले. आतापर्यंत डॉन्स ऍकॅडमीच्या माध्यमातून अनेक डान्सर तयार झाले आहेत. ऍकॅडमीच्यावतीने दरवर्षी सेलिब्रेटी कोरिओग्राफरच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. याही वर्षी दहा दिवसाचे वर्कशॉप दि.२१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या दरम्यान साताऱयात दुध संघाच्या हॉलमध्ये होत आहे. पाच सेलिब्रेटी कोरिओग्राफर पाच वेगवेगळया डॉन्स स्टाईल प्रशिक्षण देण्यासाठी येणार आहेत. प्रत्येक कोरिओग्राफर दोन दोन दिवस प्रशिक्षण देणार आहेत. ज्या लोकांना आपण रिऍलीटी शोमध्ये आपण पहातो. ते स्वतः येथे येंवून मुलांना दोन दिवसांचे मास्टर क्लासेस देणार आहेत. या वर्कशॉपचा फायदा ज्या लोकांना डान्सबद्दल काहीच माहिती नाही. परंतु डान्स करण्याची इच्छा आहे. तसेच जे लोकं डान्स करत आहेत. ज्यांना डान्समध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. अशा मुलांमुलींसाठी व महिलांसाठी हे वर्कशॉप फायद्याचे असणार आहे. मुलांच्यामध्ये यामुळे कॉन्फीडन्स लेवल व डान्सची आवड निर्माण होते. या वर्कशॉपचा लाभ साताऱयातील डान्सचे प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्यानी घ्यावा, असे आवाहन पंकज चव्हाण यांनी केले आहे. दरम्यान, पंकज चव्हाण डान्स ऍकॅडमीच्यावतीने त्या अनुषंगाने साताऱयातून सायंकाळी प्रमोशन रॅली काढण्यात आली. ही रॅली डान्स ऍकॅडमीपासून सुरुवात होवून राजवाडा, खण आळी, ५०१ पाटी पुन्हा डान्स ऍकॅडमी येथे समारोप करण्यात येणार आहे, असेही पंकज चव्हाण यांनी सांगितले.

हे सेलिब्रेटी येणार प्रशिक्षण देण्यासाठी  

या वर्कशॉपमध्ये दि.२१ आणि २२ रोजी (डॉन्स इंडिया डान्स डबल्स तसेच सो यु कॅन थिंक डॉन्स फेम)चे रोजा राना हे डान्स स्टाईल कन्टेप्टरी आणि जॅजचे प्रशिक्षण देणार आहेत. दि.२३ व २४ रोजी (हल्लाबोल विनर) रोहित मंद्रूळकर हे बॉली हॉप हा नृत्य प्रकार शिकवणार आहेत. दि.२५ व २६ रोजी (बुगीबुगी फाईट ऍण्ड चॅम्पीयन) आणि (इंडियातील पहिला हिप ऑफ ग्रुप फेम) रोहन रोकडे तसेच (डिआयडी मॉम्स फस्ट रनर अप फेम़)च्या प्रियांका रोकडे हे बॉलिवुड आणि हिपहॉप हा नृत्य शिकवणार आहेत. दि.२७ व २८ रोजी (डान्स प्लस फायनलीस्ट, वर्ल्ड ऑफ डान्सचे जुरी इन इंडिया)चे सागर बोरा हे अर्बन डान्स स्टाईलचे धडे देणार आहेत. दि.२९ व ३० रोजी (एका पेक्षा एक कोरिओग्राफर विनर तसेच डान्स का हाय फिव्हर फायनलीस्ट आणि लावणीकिंग फेम) आशिष पाटील हे बोली लावणी हा नृत्य प्रकार शिकवणार आहेत.

No comments