Header Ads

जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित शेतीचे सर्वेक्षण सुरु, ३८२२४.९९ हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज : सुनिल बोरकर satara

सातारा : सातारा जिल्ह्यात ३ ते ९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने  आजू बाजूच्या शेतपिकांचे तसेच पाणी शेतात पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले आहे. नजर अंदाजाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ३८२२४.९९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अहवालावरुन दिसून आले आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर यांनी दिली. या पिकांचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम सुरु असून येत्या चार ते पाच दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करुन शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे. शासन नियमानुसार देय अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर  देण्याबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचेही श्री. बोरकर यांनी सांगितले आहे.

जनावरांचे लसीकरण आणि बाधित जनावरांचे सर्वेक्षण

सातारा तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या गावातील बाधीत झालेल्या लहान व मोठ्या जनावरांना तसेच जनवारांचा गोठा, कोंबड्या इत्यादीसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अंकुश परिहार यांनी दिली. या मदतीमध्ये एका लाभार्थीसाठी जास्तीत जास्त तीन दुधाळ जनावरांसाठी रु. 30,000/-, शेळ्या मेंढ्या रु. 30,000/- जास्तीत जास्त 30 शेळ्या, शेतीकाम करणारी जनावरे 25,000/- जास्तीत जास्त 3 जनावरे, छोटी जनावरे रु. 16,000/- जास्तीत जास्त 6 जनावरे, प्रती कोंबडी रु. 50/- जास्तीत जास्त रु. 5,000/- तर जनावरांच्या गोठ्याची पडझड झाली असेल तर रु. 21,00/- इतकी मदत देण्यात येणार आहे.

No comments