Header Ads

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुसर्‍याच दिवशी रस्त्याच्या कामाला सुरुवात ; वडूथ-शिवथर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण satara

सातारा : राज्य महामार्ग ६५ वरील कडेगाव, सुपे, मोरगाव, निरा, लोणंद, वाठार, सातारा या मार्गावर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था तसेच याच रस्त्यावर असलेल्या कृष्णानदीवरील पुलाला लागलेल्या उतरतीकळा यामुळे हा पूल कोणत्याही क्षणी कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी वडुथ पंचक्रोशीकरांनी १६ ऑगस्ट रोजी ‘रास्ता रोको आंदोलन’ करुन तीव्र आक्रोश व्यक्त केला. दोन वर्षांपासून सुरु असलेल्या पाठपुराव्याकडे शासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात होते. अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने रस्त्याचे काम सुरु केले. अतिवृष्टीमुळे कृष्णा नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने ते बुजविण्याचे काम प्रगतीपथावर सुरू झाले आहे. सुमारे २ ते ३ वर्षांपासूनच्या रस्ता आणि कृष्णानदीवरील पुलाच्या डागडुजीला आज एकदाचा मुहूर्त मिळाल्याने येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. १५ ऑगस्टपर्यंत रस्त्याचे काम सुरु न झाल्यास १६ ऑगस्ट रोजी ‘आक्रोश आंदोलन’ करणार असल्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला होता. या इशाऱ्याची तातडीने दखल घेत या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले असल्याचे सरपंच किशोर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी दिली.

No comments