Header Ads

पांगारे येथील आपत्तीग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करु : सौ. वेदांतिकाराजे satara

सातारा : अतिवृष्टी आणि महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा तालुक्यातील पांगारे येथे जमीनीला भेगा पडल्याने आणि जमीन खचल्याने शेकडो घरे बाधीत झाली आणि ही कुटूंबे अक्षरश: उघड्यावर आली. या कुटूंबांचे संसार सावण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी पुढाकार घेत या कुटूंबांना धान्य आणि खाद्य पदार्थांचे वाटप केले. पांगारो येथील सर्व आपत्तीग्रस्तांचे संसार पुन्हा उभे राहण्यासाठी हरप्रकारे मदत करु, अशी ग्वाही सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी दिली.

अतिवृष्टी, मुसळधार पाऊस आणि महापूर अशा आपत्तींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा तालुक्यातील पांगारे येथे जमीन खचल्याने आणि जमीनीला मोठमोठ्या भेगा पडल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. पांगारे येथे जावून सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी बाधीत कुटूंबांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, गावातील भार्गव जाधव, सोसायटीचे चेअरमन मारुती पवार, दिलीप चव्हाण, विठ्ठल पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.  सौ. वेदांतिकाराजे यांनी बाधीत कुटूंबीयांना तांदूळ, डाळी, गहू यासह मेणबत्ती, काडीपेटी आणि ब्लँकेट, सोलापूर चादरी देण्यात आल्या. तसेच छ. शाहू अकॅडमीतील विद्यार्थी आणि पालकांच्यावतीने बाधीत कुटूंबीयांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि बिस्कीटचे पुडे देण्यात आले.  सौ. वेदांतिकाराजे यांनी पांगारे येथील बाधीत घरांची पाहणी केली. पाऊस कमी झाल्याने आता बाधीत कुटूंबांचा उघड्यावर आलेला संसार सावरणे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत. त्यादृष्टीनेच सौ. वेदांतिकाराजे यांनी बाधीत कुटूंबीयांशी चर्चा केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी सर्व कुटूंबीयांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. कुटूंबीयांच्या मागणीनुसार पडझड झालेल घरांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. यासाठी हरप्रकारे प्रयत्न आणि मदत करण्यात येईल. प्रशासनानेही तातडीने बाधीतांना मदत मिळावी आणि त्यांचा संसार पुन्हा मार्गी लागवा, यासाठी तातडीने पावले उचलावीत असेही सौ. वेदांतिकाराजे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

No comments