Header Ads

पाऊस कमी होताच पुरग्रस्त भागांचे होणार पंचनामे : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती satara

सातारा : सातारा जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात उद्भवलेल्या पूर परिस्थतीवर मात करण्यासाठी त्या त्या जिल्ह्याचे  जिल्हा प्रशासन सर्व उपाययोजन करीत आहे. पुरग्रस्त बाधितांना  सुरक्षित स्थळी हालविणे, त्यांना दोन वेळचे जेवण देणे आणि  आरोग्य सेवा पुरविणे ही प्राथमिकता असून पाऊस कमी होताच पुरग्रस्त भांगाचे पंचनामे करुण शासनाच्या निकषानुसार मदत केली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले. महसूल मंत्री श्री. पाटील यांनी कराड येथील पत्रकारांशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधून माहिती दिली. दरवर्षी पावसाळ्यात सखल भागात पाणी साठते तेथे पाणी साठू नये म्हणून कायमस्वरुपीच्या उपाययोजना करणार आहे. पाऊस कमी होताच प्रशासनाकडून पंचनामे करुन पुरग्रस्तांना मदत दिली जाणार आहे तसेच विविध सामाजिक संस्थांकडूनही मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

भयानक पुरपरिस्थिती निर्माण झाली असून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी उद्या पुण्याहून ८० जवांनाची तुकडी येणार आहे. या तुकडीकडे 4 बोटी  आहेत पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हालविण्यासाठी आणखी व्यवस्था केली जाईल.  राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मंत्री मंडळाची बैठक होणार आहे. पुरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शासन त्यांना पुरेशी मदत करेल. पावसाळ्यापूर्वी सर्व ब्रिटीशकालीन पुलांचे स्ट्रक्चर ऑडीट करण्यात आले असून सर्व पुल सुस्थितीत आहे त्यांना कसलाही धोका नाही. पावसाळ्यानंतरही या पुलांचे पुन्हा स्ट्रक्चर ऑडीट करणार असल्याचेही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवरुन पत्रकारांना सांगितले. तत्पूर्वी त्यांनी कराड येथील दत्त चौकात येवून पाहणी केली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.

No comments