Header Ads

तहसिल कार्यालय महाबळेश्वर यांच्या मार्फत ४ गावांना अन्न धान्य, केरोसिन वाटप satara

सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित असलेल्या ४ गावांमधील विस्थापित कुटुंबांना तहसिल कार्यालय, महाबळेश्वर यांच्या मार्फत 450 कि.ग्रॅ गहू, 450 कि.ग्रॅ. तांदूळ, 225 लि. केरोसिन आज वाटप करण्यात आले. अतिवृष्टीमुळे बाधित असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात भेकवली (कदमवस्ती), येर्णे बु., भिलार, दानवली या 4 गावात एकूण 45 कुटुंबे असून 220 कुटुंबातील व्यक्तींची संख्या आहे.   भेकवली (कदमवस्ती) या गावात प्रती कुटुंबास 10 किलो प्रमाणे एकूण  220 कि.ग्रॅ. गहू, प्रती कुटुंबास 10 किलो प्रमाणे एकूण तांदूळ 220 कि.ग्रॅ., प्रती कुटुंबास 5 लिटर प्रमाणे 110लि. केरोसिन वाटप करण्यात आले. येर्णे बु. या गावात प्रती कुटुंबास 10 किलो प्रमाणे एकूण  70 कि.ग्रॅ. गहू, प्रती कुटुंबास 10 किलो प्रमाणे एकूण तांदूळ 70 कि.ग्रॅ., प्रती कुटुंबास 5 लिटर प्रमाणे 35 लिटर केरोसिन वाटप करण्यात आले. भिलार या गावात प्रती कुटुंबास 10 किलो प्रमाणे एकूण  10 कि.ग्रॅ. गहू, प्रती कुटुंबास 10 किलो प्रमाणे एकूण तांदूळ 10 कि.ग्रॅ., प्रती कुटुंबास 5 लिटर प्रमाणे 5 लिटर केरोसिन वाटप करण्यात आले. दानवली या गावात प्रती कुटुंबास 10 किलो प्रमाणे एकूण  150कि.ग्रॅ. गहू, प्रती कुटुंबास 10 किलो प्रमाणे एकूण तांदूळ 150 कि.ग्रॅ., प्रती कुटुंबास 5 लिटर प्रमाणे 75 लिटर केरोसिन वाटप करण्यात आले.

No comments