Header Ads

शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना झाला पाहिजे : शिवेंद्रराजे satara

सातारा : अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गजरांसह नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी राज्य आणि केंद्र शासनामर्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, जेणेकरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना होईल, असे आवाहन श्री.छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. शिंदेघर ता. सातारा येथे शिंदेवाडी ग्रामपंचायत, सातारा तालुका पुरवठा विभाग आणि उत्कर्ष महिला बचत गट स्वस्त धान्य दुकानदार यांच्या सहकार्याने पंतप्रधान उज्वला योजनेतील ११ लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर आणि शेगड्या मंजूर झाल्या होत्या. या ११ लाभार्थ्यांना शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते  गॅस सिलिंडर आणि शेगड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, विद्यमान सदस्या कमल जाधव, पंचायत समिती सदस्या विद्या देवरे, सातारा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेंद्र देशपांडे, सुरेश सावंत, बाजार समितीचे संचालक श्रीरंग देवरुखे, अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीचे संचालक हणमंत देवरे, शिंदेघरचे सरपंच जीवन मोरे, करंजे तर्फ परळीचे सरपंच शशिकांत झगडे, शिंदेवाडीचे सरपंच आबा शिंदे, अरुण शिंदे, रोहिदास जगताप, विष्णू पिंपळे, प्रतिक शिंदे, यशवंत मनवे यांच्यासह परिसरातील स्वस्त धान्य वितरक, तालुका पुरवठा अधिकारी आबादास सय्यद, संतोष दळवी, जॉन राजू, रियाज शेख, ग्रामसेवक कदम आदी अधिकारी उपस्थित होते.

शिवेंद्रराजे यांनी शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या कामाकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच उत्कर्ष महिला बचत गटाच्या कार्याचाही गौरव करुन समन्वयाने विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून एक आदर्श निर्माण केल्याचे ते म्हणाले. अशाच पध्दतीने ग्रामपंचायतीने गावातील ग्रामस्थांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. नेहमीप्रमाणे या परिसरातील सर्व प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी कटीबध्द आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

No comments