Header Ads

जनता सहकारी बँकेतील प्रदीप जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार satara

सातारा : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी आणि एकमेव स्थानिक बँक असा लौकिक जपणारी जनता सहकारी बँक लि. सातारा या बँकेतील ज्येष्ठ सेवक प्रदीप वसंतराव जाधव हे बँकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त बँक व्यवस्थापन व जनता बँक कर्मचारी संघाच्यावतीने त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम बँकेच्या मुख्य कार्यालयात झाला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थिती त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भागधारक पॅनेलचे पॅनेलप्रमुख व विद्यमान संचालक विनोद कुलकर्णी मनोगतात म्हणाले, जनता बँकेत 2016 रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी बँकेतील सेवकांना बँकेच्या सेवा नियमानुसार वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत तरी आपली सेवा पूर्ण होईल की नाही याची खात्री नव्हती. परंतु सन 2016 च्या निवडणुकीत बँकेच्या सभासदांनी भागधारक पॅनेलवर दाखविलेल्या प्रचंड विश्वासामुळे 21-0 असा ऐतिहासिक निकाल दिला व आमच्या पॅनेलची एकहाती सत्ता आली व पॅनेलची जबाबदारी वाढली. बँकेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत व जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणा-या सेवकांच्या अत्यंत जिव्हाळयाच्या विषय म्हणजेच सेवानिवृत्तीचे वय 55 वर्षावरुन 58 वर्षे करणे बाबतचा ठराव. निवडणूक निकालानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या सभेच्या पहिल्याच मिटिंगमध्ये मंजूर करुन 2 जून 2016 नंतर बँकेत कार्यरत असणा-या एकूण 107 सेवकांसाठी तो बंधनकारक करण्यात आला. वयाच्या 58 वर्षांपर्यंत बँकेची सेवा करुन 3 वर्षे वाढीव सेवाकाळाचा लाभ घेणारे प्रदीप वसंतराव जाधव हे पहिले लाभार्थी ठरले आहेत. त्यामुळे भागधारक पॅनेलने  सेवकांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांचे तंतोतंत पालन केल्याचे समाधान पॅनलमधील सर्व संचालकांना असून यापुढेही बँकेतील सेवकांच्या हिताचे निर्णय प्राधान्याने घेतले जातील, याची ग्वाही दिली. या कार्यक्रमास बँकेचे चेअरमन अतुल जाधव, जेष्ठ संचालक माधव सारडा, वजीर नदाफ, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजाराम पवार, सर्व अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.

No comments