Header Ads

अक्षरसंवाद संस्थेतर्फे कास पठारावर रविवारी कवी संमेलन satara

सातारा : येथील अक्षरसंवाद संस्थेतर्फे येत्या रविवारी (दि.11) कास पठारावर खुले राज्रस्तरीर कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील ज्रेष्ठ साहित्रिका शोभा राऊत आणि ज्रेष्ठ साहित्रिक डॉ. राजेंद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध निवेदक महेश अचिंतलवार करणार आहेत. कास पठारावरील इंदू अ‍ॅग्रो टुरिझम रिसॉर्ट येथे रविवारी सकाळी11 वाजता हे कवी संमेलन होणार असून इच्छुकांसाठी शंभर रूपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. ’अक्षरसंवाद’तर्फे प्रथमच निसर्गरम्य सुंदर ठिकाणी हे कवी संमेलन होत आहे. सहभागी कवींना संयोजकांतर्फे प्रशस्तीपत्र आणि अल्पोपहार देण्रात येणार आहे. निवडक जागा असल्राने इच्छुक कवी व साहित्यप्रेमींनी लवकरात लवकर नोंदणी करावी. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी किरण किसनराव (मोबाईल : 9527659771)विनर गदो (मोबाईल : 8381055909) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments