Header Ads

जिल्ह्यातील शाळांना सलग तिसर्‍या दिवशी सुट्टी जाहीर satara

सातारा : जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून हवामान अंदाजाने आणखी दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माण तालुका वगळून सर्व तालुक्‍यांमधील शाळांना बुधवार दि.७ ऑगस्ट २०१९ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी या बाबतचा निर्णय घेतला असून अतिवृष्टीचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आपत्कालीन व पूर परिस्थिती कायम असल्यामुळे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सातारा जिल्ह्यात (माण तालुका वगळून) सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक व महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली आहे.

No comments