Header Ads

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात महाशिवलिंग दर्शनासाठी भावीकांची गर्दी satara

सातारा : येथील पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळ असणार्‍या श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात धार्मीक श्रावण महिन्यात आयोजीत धामींक समारंभात भावीकांची गर्दी वाढतच आहेतसेच मंदिराच्या प्रांगणात अभारलेल्या साडेचार फुट शिवलिंग दर्शनासाठी गर्दी होत आहे. येत्या श्रावण सोमवारी म्हणजेच , दि. 19 व दि. 26 ऑगस्टला मूलनाथेश्‍वराच्या शिवलिंगास भस्मालंकार, सहस्त्र पुषृपार्चना, फळै, भाजी, सुकामेवाचे अलंकार, सहस्त्र बिल्वार्चना प्रकारात भावीकांना अभिषेक घालण्याची सुविधा करण्यात आली असून  संगमरवरी लिंगास दिवस भर रुद्र्रिभषेक, पंचामृत व शहाळ्याच्या पाण्याने अभिषेक तसेच सायंकाळी 6 ते7 यावेळेत दर सोमवारी नृत्य सेवा आयोजीत करण्यात आले आहें. या विशेष पुजेसाठी देणगीमूल्य घेतले जाणार आहे. या पुजेनंतर भावीकांना महाप्रसाद मंदिराकडून मिळणार आहे.

श्रावण महिन्यातील दर मंगळवारी म्हणजेच दि20,आणि दि. 28 ऑगस्टला विविध श्‍लोकांचे पठण होणार असुन यात दुर्गा सप्तशती बीजमंत्र, ललीता त्रिशती अन्नपूर्णा स्तोत्र, लक्ष्मी अष्टक, गौरी दशंक हे सायंकाळी 5 ते 6 यावेणैत होणार आहे. श्रावणातील दर बुधवारी म्हणजेच दि 21 आणि दि 28 ऑगस्टला विष्णू सहस्त्रनाम, गोपीगीत ,भगवदगीतेचा पहिला अध्याय सायंकाळी 5 ते 6 या वेळेत होणार आहे. दर गुरुवारी म्हणजेच िदि. 22 आणि दिं.29 ऑस्टला दत्त सहस्त्रनाम, दक्षिणामुर्ती स्तोत्र, गुरुपादुकाष्टक हे सायंकाळी 5 ते 6 या वेळेत होणार आहे. दर शुक्रवारी म्हणजेच दि23.आणि दि. 30 ऑगस्टला ललिता सहस्त्रनाम, दुर्गा सप्तशती, बीज मंत्र व जीवनमुक्तानंद लहरी चे पठण सायंकाळी 5 ते 6 या वेळेत होणार आहे.  श्रावणातील दर शनिवारी म्हणजेच दि24 ऑगस्टला शनिदेवाला अभिषेक सकाळी 8 ते 10 येवेणैत तसेच सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हनुमान चालिसा, संपुर्ण रामायण व राम जप होणार आहे. दर रविवारी र्म्ंहणजेच दि25 ऑगस्टला सायंकाळी 5 ते 6यावेळेत हिंदुस्थानी शास्त्रीय गायन ण उपशास्त्रीय गायन तसेच भजन होणार आहे.

दरम्यान गुरुवार दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत संकष्टी चतुर्थी निमित्त रात्री 9 वाजुन 37 मिनिटांनी चंद्रोदय झाल्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. मंदिरात 23 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा होताना देवास विशेष पुष्पअलंकार सजावट करण्यात येणार आहे.तसेच सकाळी 8 ते 10 या वेळेत तुला भार करुन सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होउन रात्री राधा कृष्ण मुर्तीस  रात्री साडे नउ ते साडे दहा या वेळेत अभिेषक घालण्यात येणार आहे , रात्री साडे दहा ते साडेअकरा यावेळेत ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप संपन्न होणार आहे. रात्री साडे अकरा ते 12 या वेळेत राधाकृष्ण रथ प्रदक्षिणा, कृष्ण जन्मोत्सव व आरती होणार आहे. , दि 24 ऑगस्टला  गोपाळकाला व नृत्य सेवा सायेकाळी साडे पाच वाजता होउन सायंकाळी  साडेसहानंतर दहीहंडी सोहळा होणार आहे.  तसेच शुक्रवार  दि.30 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होणार आहे. रविवार  दि. 18 ऑगस्ट दरम्यान सायंकाळी साडे पाच ते साडे सात या वेळेत  इस्कॉन तर्फे भगवदगीता दर्शन, भजन , किर्तन व संगीत कार्यक्रम होणार आहे. वरील सर्व कार्यक्रमास ऐच्छिक देणगी मुल्य असून सातारा जिल्ह्यातील भावीकांनी या उप्रक्रमास सहभागी होवून पवित्र श्रावण मासातील धार्मीक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापकिय विश्‍वस्त रमेश शानभाग यांनी  केले आहे.

No comments