Header Ads

संगम माहुली येथील काशी विश्वेश्वर मंदिरात पुराचे पाणी ; श्रावणी सोमवारानिमित्त भाविकांची मोठी गर्दी satara

सातारा : संततधार पावसामुळे धरण भरण्याच्या मार्गावर असून, सातारा जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत आहे. कृष्णा व वेण्णा दुथडी भरून वाहू लागल्याने सातारा तालुक्यातील संगम माहुली येथील काशी विश्वेश्वर मंदिरात पुराचे पाणी आल्याने आज दर्शन बंद ठेवण्यात आले. आज पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पोलिस सुचना देत पुराचे पाणी मंदिर परिसरात असल्याने दर्शनासाठी जाऊ नये असे आवाहन करत होते. दरम्यान पुराचे पाणी गावातील मुख्य रस्त्यापर्यंत आल्याने सातारा शहरातील नागरिकांनी पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे वाहतूक व्यवस्था व नागरिकांना पुरापासून आडवणे हे ग्रामस्थांना सहज शक्य झाले.

No comments