Header Ads

साताऱ्यात प्रदर्शनामार्फत जागतिक छायाचित्र दिन साजरा satara

सातारा : छत्रपती शिवराय यांची राजधानी असलेल्या सातारा शहरात अनेक वैशिष्ट्य पूर्ण दिवस साजरा करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून साताऱ्यात विविध ठिकाणी तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला. नैसर्गिक सौंदर्य व ऐतिहासिक घटना हे अनेकांना पाहण्याचे भाग्य लाभत नाही अशा वेळी छायाचित्रे बोलकी दिसतात. त्यामुळे जगाचा इतिहास-भूगोल समोर आला आहे. त्याला मान देण्यासाठी दरवर्षी साताऱ्यात जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात येतो.

यंदाच्या वर्षी साताऱ्यातील प्रसिद्ध छायाचित्रे व्यवसायिक योगेश चौकवाले यांनी 'पावसाळी सातारा' असा विषय घेऊन स्पर्धा व प्रदर्शन भरविले होते. त्याला हौशी छायाचित्रकार, जेष्ठ साहित्यीक, नागरिक व युवा पिढीकडून उदंड प्रतिसाद मिळाला. मोबाइल, कॉमेरा, डी.एस. एल.आर कॉमेऱ्याने काढलेल्या नदी, डोंगर, ऊन, पाऊस, पाणी, पीक, प्राणी-पक्षी, ऐतिहासिक वास्तू अशा विविध प्रकारच्या छायाचित्रे तसेच दुर्मिळ यंत्रणा पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. फोटोग्राफी शिक्षणाची आवड असलेल्या अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. त्यांना चौकवाले फोटो स्टडिओचे योगेश चौकवाले यांनी छायाचित्रे व कॉमेऱ्याबाबत अध्यवत माहिती दिली. स्पर्धकांनी चांगले फोटो काढले आहेत. अशा स्पर्धा आयोजित केल्याने साताऱ्यातील छायाचित्रकार यांना प्रेरणा मिळाली आहे अशा शब्दात विद्यार्थी निनाद जगताप, महेश कोळी, सागर सावंत, जंगम, पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला अनेकांनी भेट दिली.

No comments