Header Ads

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने जिल्हयातील पूरग्रस्तांना मदत ; ब्लँकेट, कपडेसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप satara

सातारा : कोयना आणि कृष्णेला आलेल्या महापूराचा फटका सातारा जिल्हयातील कराड आणि पाटण तालुक्यातील गावांना बसला. या महापुरामुळे हजारो कुटुंब बाधित झाली. बाधित झालेल्या कुटुंबांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणिज यांच्यावतीने कराड आणि पाटण तालुक्यातील पूरग्रस्तांना ब्लँकेट, कपडे, धान्य, कडधान्य, तेल, मीठ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संस्थानचे विश्वस्त महंतेश राजशेखर कोकळकी आणि श्री. अवसरे यांच्याहस्ते करण्यात आले.

संस्थानच्यावतीने पाटण तालुक्यातील येराड, नावडी, शिरळ, पाटण, म्हावशी, मंद्रुळ, जामदारवाडी या पूरग्रस्त गावातील नागिरकांना तर कराड तालुक्यातील कराड शहर, पाटण कॉलनी, दुशेरे, रेठरे, शेरे, आटके, तांबवे, खुबी, म्होप्रे या पूरग्रस्त गावातील नागरिकांना  ब्लँकेट, कपडे, धान्य, कडधान्य, तेल, मीठ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्हा सेवा निरीक्षक सुशांत मोरे, सातारा जिल्हा सेवा निरीक्षक एन.एस.बाबर, सातारा जिल्हा सेवाध्यक्ष जितेंद्र कदम, जिल्हा युवाध्यक्ष सचिन येवले, जिल्हा महिलाध्यक्ष  सौ. सुवर्णा पवार, जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख राजेंद्र कवडे, जिल्हा कमांडर अविनाश शिंदे, जिल्हा संजीवनी प्रमुख आनंदा काटकर, जिल्हा सेवा सचिव योगेश शिंदे, प्रवचनकार भूषण आनंदीताई निकम, प्रवचनकार नीता पाटील, जयवंत डुबल, हेमंत जाधव, इंद्रजित जाधव तसेच पाटण तालुका, कराड तालुका सेवा समिती पदाधिकारी, जिल्हयातील भक्तगण आणि पदाधिकारी उपस्थित होते.

No comments