Header Ads

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन satara

सातारा : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत सन २०१९-२० या अर्थिक वर्षामध्ये रुपये एक लाख पर्यंतच्या प्रकल्प मर्यादेची थेट कर्ज योजना आणि रुपये पाच लाख पर्यंतच्या प्रकल्प मयादेची २० टक्के बीज भांडवल योजना या दोन योजना राबविण्यात येणार आहेत. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी  इतर मागास प्रवर्गात मोडत असल्याबाबतचा मूळ जातीचा दाखला व आधार कार्ड महाराष्ट राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादीत) डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, बी विंग, दुसरा मजला, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पुलाजवळ, सातारा  दूरध्वनी क्र. 02162-239984 येथे संपर्क साधवा.

No comments