Header Ads

जावलीत म्हाते खुर्द येथे मुसळधार पावसाने भिंत कोसळली satara

सातारा : जावली तालुक्यातील म्हाते खुर्द येथील राजाराम कृष्णा दळवी यांच्या राहत्या घरांची भिंत आज (मंगळवार)पहाटे मुसळधार पावसामुळे कोसळली. भिंत अंगावर कोसळल्याने राजाराम दळवी हे गंभीर जखमी झाले आहेत. जावली तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाःकार माजवाला आहे. दरम्यान, राजाराम दळवी यांची राहत्या घराची भिंत कोसळून ते स्वतः गंभीर जखमी झाले असून, पहाटेच्यावेळी घरातील सर्व झोपेत असताना भिंत कोसळण्याचा प्रसंग घडला आहे. घरातील त्यांच्या पत्नी इंदुमती, राजश्री व दोन लहान मुली थोडक्यात बचावले आहेत. या घटनेने डोंगरावर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

No comments