Header Ads

जिल्ह्यात आतापर्यंत १५११९.०३ मि.मी. पावसाची नोंद ; कोयना धरणात १०१ टीएमसी पाणीसाठा satara

सातारा : जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ५५.२२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण सरासरी ३.७४ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा-   5.47  (1605.29) मि. मी., जावळी-  5.12  (2026.88) मि.मी. पाटण-  5.27  (1796.21) मि.मी., कराड –  1.46  (936.92) मि.मी., कोरेगाव-   2.11  (633.56) मि.मी., खटाव-  0.60 (403.26) मि.मी., माण-  0 (155.13) मि.मी., फलटण- 0 (185.56) मि.मी., खंडाळा-  0.85  (497.40) मि.मी., वाई-  0.71  (830.74) मि.मी., महाबळेश्वर-  33.63  (6048.09) याप्रमाणे आजपर्यंत एकूण   15119.03  मि.मी. तर सरासरी.  1180.74  मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

कोयना धरणात आता 101.69 टीएमसी  एवढा एकूण पाणीसाठा आहे. सध्या  कोयना धरणातून 35हजार 649 क्यूसेक इतका विसर्ग सुरु आहे. कोयनेचा विसर्ग आला सामान्य पातळीवर, सध्या धरणात एकूण पाणीसाठा 101.69 टी. एम. सी. आहे.  धरणात पाण्याची आवक 25618 क्युसेक्स आहे आणि पाण्याचा विसर्ग 35649 क्युसेक्स आहे 

प्रमुख धरणातील पाणीसाठा 

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा टी.एम.सी.मध्ये पुढील प्रमाणे. धोम-10.63, धोम-बलकवडी-3.58, कण्हेर-8.66, उरमोडी-9.18, तारळी-5.00, निरा देवघर-11.43, भाटघर-23.27, वीर-8.55.

No comments