Header Ads

प्रा. शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे व राज्य शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांना मारहाण satara

सातारा : सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि राज्य शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांनी गुरुवारी मध्यरात्री दहिवडी येथे राडा केला. यामुळे संतप्त झालेल्या दहिवडी येथील ग्रामस्थांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. ही नेमकी घटना कशामुळे घडली याचा उलगडा झाला नसला तरी शिक्षक बँक नोकरभरतीच्या अनुषंगाने हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे. एका नगरसेविकेच्या पतीच्या घरावर या दोघांनी दगडफेक केली. घरसुध्दा  फोडले. यामुळे आजूबाजूचे लोक संतप्त झाले आणि त्यांनी नेमके काय झाले याची विचारणा केली. मात्र पुस्तके कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे संतप्त लोकांनी पुन्हा मारहाण केली. दरम्यान यावेळी नगरसेविकेच्या पतीने दोघांना घरात बांधून मारहाण केली. या घटनेनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

No comments