Header Ads

आयुष्मान योजनेची सातारा जिल्ह्यात सुरुवात ; पाच लाखापर्यंतचा खर्च शासन करणार satara

सातारा : नागरिकांच्या आरोग्यासाठी केंद्र शासनाने आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जाणार असून   प्रधानमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झालेल्या कुटुंबांनी या योजनेच्या लाभासाठी आपले सरकार सेवा केंद्रावर तसचे जिल्ह्यातील या योजनेंतर्गत असलेल्या 14 रुग्णालयात जावून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.  ई-कार्ड नोंदणीसाठी पत्र प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांनी  प्रधानमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड (सत्यप्रती) घेऊन जावे व आपली नोंदणी करावी. ही नोंदणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावर 30 रुपये शुल्क भरावे लागेल तर 14 रुग्णलयांमध्ये मोफत नोंदणी केली जाईल.

सातारा तालुक्यातील जिल्हा रुग्णालय, संजीवन आयसीयु प्रा.लि., ओंको लाईफ सेंटर शेंद्र, कोरेगाव तालुक्यातील श्रीरंग नर्सिग होम, कराड तालुक्यातील शारदा हॉस्पीटल, कृष्णा हॉस्पीटल, सह्याद्री हॉस्पीटल, कोळेकर हॉस्पीटल, के.एन. गुजर, फलटण तालुक्यातील निकोप हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल, सावित्री हॉस्पिटल, लोणंद, डी.जे. काटकर हॉस्पीटल वडूज, घोटावडेकर हॉस्पिटल  वाई या योजनंतर्गत सातारा जिल्ह्यातील 14 रुग्णालयांमध्ये 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार केले जाणार आहेत.

No comments