Header Ads

क्रांतिविरांगना इंदुताई पाटणकर यांचे जिवन त्याग, नीष्ठा व धैर्याने व्यापलेले : प्रा.डॉ.आ.ह.साळुंखे satara

सातारा : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिका क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर यांचे जीवन म्हणजे समर्पण, असिमत्याग, निष्ठा, निर्धाराने व धैर्याने व्यतीत झालेले होते. पाटणकर कुटुंब हे अद्वितीय असेच कुटुंब असल्याचे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ.आ.ह.साळुंखे यांनी सातारा येथे बोलताना केले. क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर चरित्रग्रंथाचा प्रकाशन समारंभ जेष्ठ संशोधक डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते आणि प्रा.डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथील पाठक हॉलमध्ये झाला. त्यावेळी डॉ.साळुंखे बोलत होते. यावेळी चेतना सिन्हा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विचारमंचावर पत्रकार हरिष पाटणे ऊपस्थित होते.

डॉ. भारत पाटणकर यांनी आपल्या आईच्या आठवणी या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. असे सांगुन डॉ.साळुंखे म्हणाले, हे पुस्तक आत्मचरित्र व चरित्र यांच्या सिमारेषेवर रेंगाळणारे आहे. क्रांतीचा इतिहास या पुस्तकात आला आहे. हे पुस्तक स्वातंत्र्य चळवळीचा, सामाजिक क्रांतीचा महत्वाचा दस्तऐवज आहे. डॉ. भारत पाटणकर यांचा आईवरील मृत्यूलेख हे एक काव्यच आहे असे सांगुन डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर म्हणाले, इंदुताई यांच्या म्हणण्यानुसार कॉम्रेड हा कधी पराभूत होत नाही. अंतिम विजय कॉम्रेडचाच असतो त्यामुळे परिवर्तनवाद्यांनी हे समजून घेतले पाहिजे. इंदुताई पाटणकर या आमच्या पिढीच्या रोल मॉडेल होत्या. आमच्या पिढिला सोप्या भाषेत आत्मविश्वास दिला, सल्ला दिला. जबाबदारीची जाणीव करुन दिली. असे सांगत चेतना सिन्हा यांनी मला प्रतिसरकार बद्दल इंदुताई यांच्या कडुनच माहिती मिळाल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी पत्रकार हरिष पाटणे यांचेही भाषण झाले.

 प्रास्ताविक पत्रकार प्रशांत पवार यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी क्रांतीवीर बाबूजी पाटणकर, इंदुताई पाटणकर, डॉ. भारत पाटणकर यांच्या कार्याचा व निर्धाराचा आढावा घेतला. सुत्रसंचालन विजय मांडके यांनी केले. आभार शरद जांभळे यांनी मानले. प्रारंभी क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य चळवळीत शहिद झालेल्या व पुरात बुडून मरण पावलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कॉ.किरण माने, डॉ. प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी, संतोष गोटल, हरिश्चंद्र दळवी, पुरुषोत्तम शेठ, बाबुराव शिंदे, गौतम भोसले, दिलिप ससाणे, अमृत साळुंखे, संकेत माने, शुभम ढाले आदी मान्यवरांसह अनेक जन ऊपस्थित होते.

No comments