Header Ads

कराड शहरातील पुरपरीस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी ; गणपती बनविणाऱ्या कारागिरांच्या नुकसानाचे होणार पंचनामे satara

सातारा : कराड शहर आणि तालुक्यातील गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे ही प्राथमिकता जिल्हा प्रशासनाची असेल. शिंदे आळीतील  गणपती बनविणाऱ्या कारागिरांचे जे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे केले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली. कराड शहरातील शिंदे आळी, दत्त चौक, येथील पूर परिस्थितीची एका बिल्डिंगच्या छतावर जावून पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्या समवेत प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार, माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर, विक्रम पावसकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोयना, धोम या धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे कृष्णा आणि कोयना नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून, त्याचे पाणी कराड शहरातील दत्त चौका पर्यंत पोहचल्यामुळे अनेक घर पाण्याखाली गेली आहेत. त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी  हलविण्यात आले आहे. कराड तालुक्यातील इतर पूरग्रस्त गावातील नदीच्या सखल भागात राहणाऱ्या लोकांना पूर येण्याची वाट न पाहता तत्काळ तात्पुरत्या निवाऱ्यात हलविण्याच्या सूचना प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यानी या वेळी दिल्या.

No comments